
सावंतवाडी : शहरातील सालईवाडा हेळेकर ग्राउंडच्या शेजारी जुनाट विहीरीमध्ये गोमाता पडली होती. येथील फारूख शेख यांच्या हीबाब निदर्शनास येताच त्यांनी न.प. प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. यानंतर त्या गाईस जीवदान देण्यात आले.
शहरातील सालईवाडा हेळेकर ग्राउंडच्या शेजारी जुनाट विहीरीमध्ये गोमाता पडली होती. येथील फारूख शेख यांच्या हीबाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबत नगरपरिषद प्रशासनाला कल्पना दिली. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना ही बाब त्यांनी सांगितली. यानंतर त्वरित नगरपरिषदचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी जात त्या गोमातेला सुखरूप बाहेर काढल. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्या गाईला जीवदान दिले. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी कठडा नसलेल्या विहीरी असून त्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. यादृष्टीने उपययोजना करण्यात यावी व मुक्या प्राण्यांसह मनुष्याला धोका पोहचू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरीकानी केली आहे