...तर बस स्थानकात चक्काजाम करू ; राष्ट्रवादीचा इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: July 14, 2023 14:48 PM
views 288  views

सावंतवाडी : शहरातील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीनं कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. बस स्थानकाची झालेली दुरावस्था, बस स्थानकाची सुधारणा करण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये असणारी अनास्था व त्यांच्या ढिसाळ कारभार याचा निषेध करत अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. १५ दिवसांमध्ये जर बस स्थानकाची परिस्थिती सुधारली नाही, बस स्थानकामध्ये महिला मुली व इतर प्रवाशांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण ते देऊ शकले नाही तर बस स्थानकामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


या आंदोलनात केलेल्या प्रमुख मग्ण्यांमध्ये संपूर्ण बसस्थानकाची दिवसभरात किमान २ वेळा स्वच्छ्ता झाली पाहिजे,आसन व्यवस्था दुरुस्त करण्यात यावी,रात्रीच्या वेळी बसस्थानकात पुरेसा उजेड असण्यासाठी रोषणाई व्हावी,डेपो मधील शेड दुरुस्ती,डिझेल पंप शेड वॉटर प्रुफिंग ,कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात, बसस्थानकात डांबरीकरण करून लेव्हालिंग करण्यात यावे ज्यामुळे पाणी साचणार नाही,बसस्थानकात ऑन ड्युटी पोलिसांसाठी कक्ष,हिरकणी कक्ष यांची निर्मिती करण्यात यावी.या मागण्या करण्यात आल्या आहेत.


या आंदोलन प्रसंगी माझ्या समवेत महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, चराटा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, रत्नागिरी महिला जिल्हा निरीक्षक दर्शना बाबर देसाई, उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष आशिष कदम, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, अल्पसंख्यांक तालुका महिला अध्यक्ष मारीता फर्नांडिस, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जहूर खान, शहरचिटणीस राकेश नेवगी,  उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, वैभव परब, शेखर परब आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने सावंतवाडीकर नागरिक देखील उपस्थित होते.