विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून विनायक राऊत यांच्या विजयाची हॅटट्रिक होऊ दे

लोकांच्या मनातील खदखद मतदानातून बाहेर येऊ दे खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात अभिषेक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 15, 2024 06:07 AM
views 89  views

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन विजयाची हॅटट्रिक करावी यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतत्वाखाली कार्यकर्त्यांनी देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरात अभिषेक केला. 

शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस मालवण विविध सामाजिक, आणि धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विनायक राऊत हे होऊ घातलेल्या लोकसभा  निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत यासाठी गावागावातील मंदिरांमध्ये शिवसैनिकांकडून अभिषेक करण्यात आला.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरात अभिषेक केला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त व्हावे आणि आज लोकांच्या मनामध्ये असलेली खदखद मतदानाच्या रूपातून बाहेर येऊ दे असे साकडे यावेळी घालण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मंदार केणी, सन्मेश परब, पूनम चव्हाण, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, उमेश मांजरेकर, सिद्धेश मांजरेकर, निनाक्षी मेथर, रश्मी परुळेकर, उमेश चव्हाण, हेमंत मोंडकर, अक्षय भोसले, करण खडपे, यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.