कुडाळ येथे रविवारी दिव्यांग बांधवांचा आनंद मेळावा..!

रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगांव वेस्ट, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांचे संयुक्त आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 09, 2022 15:09 PM
views 268  views

सावंतवाडी : सामाजिक कार्यकर्ते पुष्कराज कोले यांच्या संकल्पनेतून तसेच रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगांव वेस्ट, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित दिव्यांगासाठी दिव्यांग बांधवांचा एक दिवसाचा आनंद मेळावा रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केला आहे.

या आनंद मेळाव्यामध्ये मंजूर अपंग लाभार्थ्यांना कृत्रिम मोफत साहित्य वाटप व पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम संपन्न होणार आहे. सकाळी ९ ते १० वा. स्वागत व चहापाणी-नाष्टा, १० ते ११ वा. प्रास्ताविक, सकाळी ११ ते दु. १२ मोफत कृत्रिम साहित्य वाटप, दु. १२ ते १ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व विजेत्यांचे मनोगत, दु. १ वा. जेवण, दु. २ वा. समारोप असा कार्यक्रम असून सदर कार्यक्रम  साईराज रेसिडेन्सी, क्लब अॅण्ड रिसॉर्ट, काळेपाणी-पिंगुळी (कुडाळ-वेंगुर्ला रोड), ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार असल्याचे निमंत्रक बापू गिरप, बाळासाहेब पाटील (राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ), संदीप सावंत अध्यक्ष (रोटरी क्लब ऑफ मुंबई गोरेगांव वेस्ट) यांनी कळविले आहे.

यावेळी कर्णबधिर, मुकबधिर, अस्थिव्यंग, अंध व इतर सर्व प्रकारच्या अपंगांची वधु-वर नोंदणी व दिव्यांग खेळाडू व कलाकार यांची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९७६७८०००१० या मोबाईल क्रमांकावर 

संपर्क करावा

.