शेनाळे शाळेत कायदेविषयक व्याख्यान

Edited by: मनोज पवार
Published on: May 31, 2025 12:06 PM
views 160  views

 मंडणगड : खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालय आयोजित मंडणगड तालुक्यातील शिरगाव धोत्रोळी शेनाळे आणि वाकवली ग्रामस्थ विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिवशीय कायदेविषयक कार्यशाळा दिनांक 30 मे 2025 20 25 रोजी पूर्ण प्राथमिक शाळा सेनाळे येथे मोठ्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात संपन्न झाली.

सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्राध्यापक एडवोकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी साध्या, सरळ आणि सोप्या भाषाशैलीत उपस्थितताना विविध कायदेविषयक सविस्तर माहिती दिली.

प्राध्यापक अॅडवोकेट दिलीप चव्हाण यांनी बाल लैंगिक शोषण, कौस्तुभ जोशी यांनी ग्रामपंचायती कायदा, पंडित कोळेकर यांनी मोटार वाहन कायदा, संपदा शिंदे यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा, धनश्री नायर यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले कल्पेश शिंदे यांनी विधी महाविद्यालयाच्या एकंदर उपक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन सिद्धयोग विधी महाविद्यालयाची सविस्तर ओळख करून दिली.

शिरगावचे सरपंच गणेश पेंढारी यांनी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. असे कायदे विषयक उपक्रम सातत्याने घेतल्यास खरोखरच रत्नागिरी जिल्हा सुधारण्यास वेळ लागणार नाही गुणे घडणारच नाहीत असे प्रतिपादन ग्रामविकास अधिकारी हुमणे यांनी कार्यक्रमाची प्रशंसा करताना केले. शेनाळे गावचे पोलीस पाटील अमित बैकर यांनी आपला अभिप्राय देताना सांगितले की रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील सिद्धयोग विधी महाविद्यालय हे एकमेव विधी महाविद्यालय आहे जे गावोगावी जाऊन कायदेविषयक व्याख्याने देते त्यांची ही सेवा खरोखरच वाखाण्याजोगे आहे असे ते म्हणाले.

अशा सेविका धोत्रोळी यांनी आपल्या विशेष शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली तर शिरगावचे माजी सरपंच विश्वनाथ सावंत यांनी शुद्ध योग विधी महाविद्यालयाला धन्यवाद देत आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.