
सावंतवाडी : रोटरी क्लब, सावंतवाडीच्यावतीने आणि माजी सनदी अधिकारी संजय ठाकूर यांच्या सहकार्याने खगोलशास्र अभ्यासक, पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे "आकाशातील रहस्ये" या विषयावर गुरुवार दि.१ मे रोजी सकाळी १०.३० वा. नॕब हाॕस्पिटल, भटवाडी सावंतवाडीच्या पहिल्या मजल्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
श्री.सोमण हे पंचाग कसे पहावे यावरही मार्गदर्शन करणार आहेत. श्री.सोमण हे गेली ६० वर्षे वृतपत्रातुन लेखन करीत आहेत. "खगोलशास्रावर" ९ हजारहून अधिक व्याख्याने त्यानी दिली आहेत. आकाशदर्शन, धुमकेतू, चंद्र-सुर्य गृहणे, आपले उत्सव इ. पुस्तके लिहीली आहेत.
अशा थोर व्यक्तीचे व्याख्यान ऐकण्याची संधी रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.प्रमोद भागवत यानी केले आहे.