३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वेंगुर्ल्यात व्याख्यान...!

Edited by: दिपेश परब
Published on: August 19, 2023 14:38 PM
views 145  views

वेंगुर्ला : तालुक्यामधील सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचीत्याने व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

व्याख्यानाचे आयोजन रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ४:३० वाजता नगर वाचनालय, वेंगुर्ला शहर (श्री देव रामेश्वर मंदिर नजीक) येथे करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मिलिंद कुलकर्णी, कणकवली यांचे शिवराज्याभिषेक, स्वराज्य आणि राष्ट्रनिर्माण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

आपल्या सर्वांना ज्ञातच आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी इसवी सन १६७४ साली किल्ले रायगडावर अत्यंत दिमाखात शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. काही शतकांनंतर हिंदूंना स्वतःचा सार्वभौम राजा मिळाला. याप्रमाणे हे २ जून २०२३ ते २० जून २०२४ वर्ष शिवराज्याभिषेक दिनाचे ३५० वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याचे महत्व, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.