आरक्षण सोडत !

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 18:04 PM
views 383  views

सावंतवाडी : सावंतवाडी : तहसिल कार्यालय सावंतवाडी येथे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत आज चार वाजता कोतवाल आरक्षण सोडत पार पडली.

कोतवाल भरतीच्या १७ रिक्त पदांपैकी १४ पदभरती करीता आरक्षण सोडत केली गेली. सावंतवाडी ग्रामीण, कोलगाव व ओवळीये ही गावं वगळण्यात आली. बरीच वर्षे रिक्त असणारी पद प्रामुख्याने भरली जाणार आहे. लहान मुलांनी चिठ्ठी काढून या जागांची आरक्षण सोडत केली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यात मळगाव : अनुसुचित जाती. (महिला),सांगेली : अनुसूचित जमाती, चौकुळ: अनुसूचित जमाती. (महिला),माखडोल : भ.ज.ब.,तळवडे : भ.ज.क,कुणकेरी: भ.ज.डळचराठे : विशेष मागास प्रवर्ग,सातार्डा : इतर मागास प्रवर्ग.,इन्सुली: इतर मागास प्रवर्ग. (महिला),सावंतवाडी शहर : इतर मागास प्रवर्ग.,तळवणे : इतर मागास प्रवर्ग.,डेगवे : EWS (महिला),निगुडे : EWS,

असनिये : अराखीव पद अशी आरक्षण सोडत करण्यात आली.