
कुडाळ : कुडाळ ते कोरजाई ही संध्याकाळी 6 :40 ला सुटणारी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने ती वेळेवर सोडण्यात यावी अशी मागणी कवठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने उपसरपंच त्रुतुजा खडपकर यांनी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
कवठी शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुख यांना निवेदन देऊन म्हटले आहे की, संध्याकाळी 6 :40 ला कुडाळ वरुन कुडाळ ते कोरजाई ही बससेवा विद्यार्थी व कामावरुन सुटणा-या प्रवाशांसाठी सोयीची असते. परंतु केव्हा केव्हा अचानक ही बस रद्द केली जाते किंवा वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल होत असतात. यापुढे असे झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा सौ खडपकर यांनी दिला आहे. तसेच कवठी ते कुडाळ सकाळी अकरा वाजता कवठी वरुन सोडण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, उपसरपंच त्रुतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश वाड्येकर, नेरुर जिल्हा परिषद उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, शाखा प्रमुख राजन खोबरेकर, रुपेश खडपकर आदी उपस्थित होते.