
दोडामार्ग : तालुक्यातील साटेली भेडशी येथे मटका घेणाऱ्या तिघांवर एलसीबी व दोडामार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात एकूण १२ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दोडामार्ग पोलिस ठाण्यातून देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) व दोडामार्ग पोलिस यांनी साटेली भेडशी बाजारपेठेत छापा टाकला. यावेळी मटका घेणाऱ्या तिघांवर कारवाई केली. भास्कर दळवी रा घोटगे, उदय धर्णे साटेली भेडशी, व संजय नाईक रा. साटेली या तिघांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे कल्याण व मुंबई मटक्याचे कागद मिळाले. तसेच त्यांची अंग झडती घेतली असता एकूण १२ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल मिळाला.
हा मुद्दे माल ताब्यात घेत तिघांनाही येथील पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती यावेळी एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, मोहन पेडणेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर, कुंदन कामत व दोडामार्ग पोलीस बाबी देसाई, संजय गवस यांनी ही कारवाई केली.