मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेचे निकाल जाहीर

SPK लाॅ कॉलेजचा ९९ टक्के निकाल
Edited by:
Published on: July 26, 2024 12:57 PM
views 205  views

सावंतवाडी  :  एप्रिल २०२४ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. 

सावंतवाडीतील पंचम खेमराज लाॅ कॉलेजचा निकाल ९९ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  उत्तीर्ण विद्यार्थांना कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, अॅड. पूजा जाधव, अॅड. अश्विनी वेंगुर्लेकर, अॅड.अभिरुची राऊळ, अॅड. सोनाली कुडतरकर, अॅड.  श्रीषा कुलकर्णी याचं मार्गदर्शन लाभलं.   

तसेच संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, तसेच श्रद्धाराजे भोसले, ॲड. शामराव सावंत, डी.टी देसाई, डॉ. सतीश सावंत, डॉ. दिलीप भारमल, श्री.जयप्रकाश सावंत व संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेकडून व लॉ कॉलेज कडून अभिनंदन करण्यात येत आहे.