मल्टी स्किल डेवलपमेंट अंतर्गत दाभोली येथे “तंत्र शिक्षण विभागाचा" शुभारंभ...!

Edited by: दिपेश परब
Published on: June 25, 2023 20:01 PM
views 210  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीच्या दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली या माध्यमिक शाळेत मल्टी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत तंत्र शिक्षण विभागाचा शुभारंभ थाटात पार पडला

"हाताला काम, श्रमाला दाम" या उक्तीनुसार या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढीस लागणे या दृष्टीने दाभोली सारख्या ग्रामीण भागात तंत्र शिक्षण विभाग हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

तंत्र शिक्षण हे गगना एवढं क्षेत्र आहे. त्याची ओळख विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम सोबत व्हावी यासाठी दाभोली इंग्लिश स्कूल शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ , दाभोली इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीने तसेच कोझ टू कनेक्ट फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून या तंत्र शिक्षण विभागचा शुभारंभ दाभोलीतील जेष्ठ कारागीर श्री. मेस्त्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात यू.पी.एस.सी परीक्षेत देशात ७६ वा क्रमांक प्राप्त केलेल्या दाभोली गावचे सुपुत्र आय ए एस वसंत प्रसाद दाभोलकर यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, कॉझ टू कनेक्ट चे अनिरुद्ध बनसोड, प्रभाकर सावंत, शाळा व्यवस्थपन समिती अध्यक्ष सुधीर गोलतकर, मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर, मिलिंद शंकर साठे, मठ हायस्कुल मुख्याध्यापक सुनील जाधव, आर.पी.बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, मुख्याध्यापक श्री हेवळकर, राखी दाभोलकर, महेश बोवलेकर, माजी विद्यार्थी एकनाथ राऊळ, केतन खानोलकर, श्री. मयेकर, दिलीप अरावंदेकर, तंत्रशिक्षण प्रशिक्षक दत्तप्रसाद संगेलकर, राजेश कांबळी, प्रतीक्षा पोईपकर, पांडुरंग जाधव, श्री. कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 

या तंत्र शिक्षण विभागात ऊर्जा आणि तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, कार्य शाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान, बागकाम आणि शेती तंत्रज्ञान या बरोबरच शालेय विद्यार्थ्यासाठी वाचनालय व अभ्यासिका तसेच इंग्लिश कोपरा, बुद्धिबळ सराव टेबल याचा ही शुभारंभ वसंत दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. कोकणी माणसांजवळ बुद्धिमत्ता आहे. याचा वापर स्वयंस्फूर्तीने होणे गरजेचे आहे. जे हाताने काम करतात तेच यशस्वी होतात. कौशल्य व कला ही जीवनात खूप महत्वपूर्ण आहे. सध्याच्या काळात आपल्या मुलांना हेच शिकण्यासाठी शाळेत पाठवा. असा उपक्रम कोकणातील प्रत्येक शाळेत सुरु व्हावा असा मानस डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा चोडणकर यांनी तर आभार प्रदर्शन वसंत पवार सर यांनी केले.