राजन तेलींच्या प्रचाराचा शुभारंभ

विजयाचा शिवसैनिकांचा विश्वास
Edited by:
Published on: November 08, 2024 12:46 PM
views 295  views

सावंतवाडी : येथील विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव पाटेकर आणि श्री देव उपरलकर चरणी श्रीफळ वाढवून करण्यात आला. राजन तेली भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोजा,शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, साक्षी वंजारी, उमेश कोरगावकर,निशांत तोरस्कर, प्रथमेश तेली, आशिष सुभेदार, राजू मसुरकर,उदय राणे, बाबल्या दुभाषी, शब्बीर मणियार, कल्पना शिंदे,संदीप वेंगुर्लेकर,समीरा खलील, फलकरा शेख,विजया राजपूत यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे  उबाठा शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सावंतवाडी करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री तेली मोठ्या मताधिक्याने विजयी होतील आणि आपल्या हक्काचा आमदार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. राजन तेली तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा यावेळी उपस्थितकडून देण्यात आल्या. श्री तेली यांनी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदार संघात गाव भेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला आहे. या दौऱ्याला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.