पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यातील मातांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद : जिल्हाधिकारी किशोर तावडे
Edited by:
Published on: March 03, 2024 11:51 AM
views 60  views

सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आजच्या पल्स पोलिओ मोहिमेत देखील जिल्ह्यातील मातांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद  कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. सई धुरी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आशा स्वयंसहाय्यक उपस्थित होते.

शून्य ते पाच वर्षे वयोगटातील  जिल्ह्यातील ३४ हजार ९०१ बालकांना  पोलिओचा डोस पाजला जाणार आहे. जिल्ह्यातील ९०७ लसीकरण केंद्रावर ही मोहीम राबविली रविवारी राबविली जात आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे  यांच्या उपस्थितीत  जिल्हा रुग्णालय सिंधूनगरी येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन एका बाळाला पोलिओ डोस पाजून झाले. 

डॉ. सई धुरी यांनी पल्स पोलिओ बाबत यावेळी विस्तृत माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य जनजागृती असून शासनाच्या कोणत्याही  उपक्रमाला नागरिकांचा फार मोठा प्रतिसाद मिळतो हे या जिल्ह्यात एक चांगली बाब आहे. पल्स पोलिओ उपक्रमातही जिल्ह्यातील मातांचा सक्रिय सहभाग असतो.  सन २०२२ मध्ये पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर आज ३ मार्च रोजी  ही मोहीम संपन्न होत आहे. आरोग्य विभागाची ९०९ पथके  काम करत आहेत. जिल्ह्यात

२ लाख ५ हजार २४ एवढ्या घराला भेट देऊन  हे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी आठ ते पाच या वेळात  हे लसीकरण होत आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्थानके, यात्रा ठिकाणी, विमानतळ, टोलनाके, मजूर वस्त्या इत्यादी ठिकाणी ४० मोबाईल पथके कार्यरत आहेत असे हे डॉ. सई धुरी यांनी सांगितले.