वेंगुर्ले खरेदी विक्री संघांत 'पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्रांचा' शुभारंभ

Edited by: दिपेश परब
Published on: July 27, 2023 14:17 PM
views 197  views

वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी राजस्थान मधुन "पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा " शुभारंभ केला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पहाण्यात आला.

     पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात किसान समृद्धी सुवीधा केंद्र देशभरात २ लाख ८ हजार ठिकाणी सुरु केली. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके व अन्य अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. वेंगुर्ले तालुक्यात शहरामध्ये ५ केंद्र व ग्रामीण भागात १६ केंद्र आहेत.  त्याठीकाणी भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांना एकत्रित करुन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटनपर संभाषण प्रसारित केले होते. या कार्यक्रमाला ठिक ठिकाणी शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

     शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे. सध्या तालुका, प्रांत, ब्लॉक, खेडेगांव पातळीवर खतांची किरकोळ विक्री करणारी (रिटेल शॉप) केंद्रे आहेत. त्याचे रूपांतर आता वन स्टॉप शॉप मध्ये होणार आहे.

  वेंगुर्ले खरेदी विक्री संघांत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे अध्यक्ष मनिष दळवी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, विजय महादेव रेडकर, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभू, संचालक एम.जी.मातोंडकर, सोमा मेस्त्री,  बाबाजी सावंत, नंदकिशोर घाडी, मोहन सावळ, ज्ञानेश्वर वैद्य, रामकृष्ण सावंत, निलेश पाटील, प्रशांत पांढरे, संतोष केणी, सूर्यकांत गावडे, नारायण वैद्य, कांचन नाईक, प्रदीप जबडे, श्रीकृष्ण परब, हर्षल परब, वसंत खाजणेकर, गणेश मेस्त्री, संजय केणी, विजय केळजी, वृंदा गवंडळकर, श्रीकांत परब, दशरथ सावंत, नारायण परब, किसान मोर्चाचे यशवंत पंडित , किशोर परब, कमलेश गावडे, सीताराम तुळसकर, संतोष परब, रामदास  रेडकर, सत्यवान पालव, प्रसाद कोनकर, ता.चिटणीस समीर कुडाळकर इत्यादी शेतकरी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.