वझरे धान्य दुकानात तांदळाला लागल्या अळ्या | उबाठा सेनेने वेधल तहसिलदार यांचं लक्ष

Edited by: संदीप देसाई
Published on: October 20, 2023 19:12 PM
views 185  views

दोडामार्ग : वझरे गावचे माजी सरपंच लक्ष्मण गवस यांच्या पुढाकाराने वझरे गावातील धान्य दुकानातून करण्यात येणारा धान्य पुरवठा दर्जाहीन असल्याची बाब शुक्रवारी उबाठा सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तहसील कार्यालयावर धडक देत उघड केली. त्यांनी चक्क अळी लागलेले तांदूळ तहसीलदार संकेत यमगर यांना प्रत्यक्ष दाखवत सरकारचा निषेध नोंदवला. 

जनतेला असा निकृष्ट धान्य पुरवठा केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेनेने दिलाय. तसेच ज्या धान्य दुकानदारांना आळ्या लागलेले धान्य राशन आले असल्यास त्या धान्य राशन धारकानी ते जनतेला वितरित न करता तहसील कार्यालायात जमा करावे अशी मागणी करण्यात आलीय. याबाबत आपण चौकशी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठवू असे आश्वासन तहसीलदार यांनी दिलंय.

यावेळी  शिवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, माजी सरपंच लक्ष्मण गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, यांसह पदाधिकारी संदेश राणे, संदेश वरक, मिलिंद नाईक, समीर म्हावसकर, लक्ष्मण आयनोडकर, आदी उपस्थित होते.