
वैभववाडी : तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात आज सकाळी ११.४५दरम्यान दरड कोसळली.यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू असून काही वेळात वाहतूक सुरळीत सुरू होईल.
तालुक्यात गेले चार दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. घाट परिसरातही मुळसधार पावसाच्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. यामुळे करुळ घाटात सुर्यास्त पॉईंटनजीक दरडीचा काही भाग आज सकाळी रस्तावर कोसळला. दरडीतील दगड व मातीने रस्ता व्यापला होता. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. काही वाहनचालकांनी रस्त्यावरील दगड बाजूला करून येथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्यावतीने दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. काही वेळात वाहतूक सुरळीत होईल.