पायाखालची जमीन सरकली, ५० लाखाची निरा योजना आठवली

शिवसेना कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांची टीका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 25, 2022 21:37 PM
views 231  views

वैभववाडी : राज्यात महागाई, बेरोजगारी, भुलथापा, भष्ट्राचार, शेतकर्‍यांचे हाल, स्त्रीयांचा उपमर्द करणा-या सत्ताधार्‍यांच्या मुजोरीने जनता त्रस्त झाली आहे. राज्यांचा व जिल्ह्याचा र्‍हास सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. हे सर्व कोकणी नागरीकांच्या लक्षात येत अाहे. या नैराश्यातूनच येथील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीत निधीची अमिषे दाखवून दिशाभूल करीत आहेत, अशी टीका शिवसेना कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे.       


तालुक्यातील एका पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात जबाबदार नेत्यांने आचारसंहिता भंग होऊन अस वक्तव्य केले होते. यावरून शिवसेनेचे श्री सरवणकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिकास्त्र केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यातील सुमारे ३२५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत नेत्यांच्या असंस्कृतपणामुळे  त्यांचे नाव घेऊन लोकांसमोर जाण्याचे धाडस कार्यकर्त्यांना राहिले  नाही. सध्या सत्तेतुन उतरलेले सरपंच आता पक्षाला व नेत्यांच्या नावाला तिलांजली देवुन गाव पँनेलच्या नावाखाली  वेगळी नावे घेऊन सर्व गावाकडे मताची वाडगी घेऊनच जाताना दिसतात. 


अाता आपले कार्यकर्ते आपले नावाला गच्छंती देवुन  जाऊ लागले आहेत, असे चित्र सर्वकडे दिसत आहे. आपले महत्व कमी होत आहे. हे पाहुन  करिष्मा नेत्यांचे पायाखालची वाळु हळु हळु सरकु लागली. त्यामुळे आचारसंहीता लागु असताना सुध्दा जणु ईडी , सी.बी.आय प्रमाणे, निवडणुक आयोगाचेही संचालक आपल्याच पक्षाचे असणार आहेत, असा भ्रम करुन,  "जी ग्रामपंचायत  कोणतेही कातडी पांघरुन आपले कार्यकर्ते आपल्या पायाशी आणुन देईल, त्यांना आपण ५० लाख देणार असे" नेते सुध्दा बरऴु लागले, अश्या मिश्कील भाषेत  श्री. सरवणकर यांनी टीका केली आहे.