पत्रकार दिनानिमित्त लक्ष्मी निसादचा सत्कार

मातृभाषा मराठी नसताना मराठी भाषेत मिळवले देदीप्यमान यश
Edited by:
Published on: January 06, 2025 15:42 PM
views 321  views

दापोली : मातृभाषा मराठी नसताना देखील मूळ उत्तर प्रदेश येथील असणाऱ्या व सध्या दापोली शहरातील ए. जी. हायस्कूल येथे शिकत असणाऱ्या विद्यार्थिनी लक्ष्मी निसाद हिने मराठी भाषेत उज्वल यश संपादन केले. याबद्दल तिचा पत्रकार दिनानिमित्त दापोलीतील तमाम पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लक्ष्मी निसाद ही सध्या अकरावी मध्ये शिकत आहे. तिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी भाषेत 100 पैकी 96 गुण प्राप्त केले. मातृभाषा मराठी नसताना देखील अत्यंत खडतर परिस्थितीत तिने हे उज्वल यश संपादन केले. याबद्दल दापोली तालुक्यातील  पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील कार्यक्रमात तिचा गौरव करण्यात आला.

यावेळी तिची आई कुसुमकळी निसाद, शिक्षिका एस. एस. दाभोळे, बहीण पूजा नुसाद यांच्यासह पत्रकार शिवाजी गोरे, प्रवीण शिंदे, चंद्रशेखर जोशी, यशवंत कांबळे, योगेश दळवी, बाळासाहेब नकाते, विद्यमान गुरव, समशाद खान, सुदेश तांबे, प्रतीक तुपे, सलीम रखांगे, शिवम शिंदे, मनोज पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच यापुढे देखील एकत्र राहून पत्रकार एकजुटीचे दर्शन घडवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी  पत्रकारांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.