
देवगड : पत्रकार तसेच कवी,लेखक बाळा कदम यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत कदम (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी १६ ऑक्टोबरला निधन झाले. माजी पं. स. सदस्या आणि विजयदुर्गच्या माजी सरपंच सौ. शुभा कदम यांच्या त्या सासू होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे