
कणकवली : फोंडाघाट चेकपोस्टवर सावंतवाडी हून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेली कार १९ जून रोजी रात्री ८.३० सुमारास चेक पोस्टवर आली असता तेथे कार्यरत असलेले नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी तपासली या कारमध्ये सुमारे 38 लाख 67 हजार रोख रक्कम आढळून आली. असून या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.