'लाडकी बहिण'मुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

शिवसेनेच्या महिला उपनेत्या मीनाताई कांबळी यांचा टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: August 29, 2024 09:59 AM
views 206  views

सावंतवाडी : गावागावातील प्रत्येक महिलांच्या हातात दीड हजार रुपये दर महिन्याला मिळायलाच हवेत आणि हे दीड हजार रुपये आता मिळायला‌ ही लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना अद्याप लाभ मिळाला नाही अशा महिलांचा शोध घ्या, त्यांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. माझी लाडकी बहीण योजना ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचायलाच हवी. माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून महिलांचा सन्मान केला आहे असे विधान शिवसेनेच्या महिला उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी केले. सावंतवाडी येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.


सावंतवाडी येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा रवींद्र मंगल कार्यालयत आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील  माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या 22 महिला यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या महिला नेत्या तृष्णा  विश्वासराव, जिल्हाप्रमुख अँड नितासावंत कविटकर, अनारोजिन लोबो, अर्चना पांगम,  उत्कर्षा गावकर, सोनाली परब,  यशश्री सौदागर, चेतना गडेकर,  दिशा शेटकर, श्रध्दा  बावीस्कर, भारती मोरे, शीतल हरमलकर, चैञाली गावडे, निकीता परब, सपना नाटेकर, सुवर्णा नाईक, शर्वरी धारगळकर महीलाआघाङीतील पदाधिकाऱ्यांसह  जिल्हाप्रमुख  अशोक दळवी, नारायण राणे, नितिन मांजरेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, प्रचिती कुबल, तारामती सावंत आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक महिला जिल्हाप्रमुख अँड. नीता सावंत कविटकर यांनी केले. त्या म्हणाल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक घराघरात मिळून दिला जात आहे. आता प्रत्येक भागात आम्ही जाऊन ज्याला लाभ मिळाला नाही त्याला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे स्पष्ट केले.