शासकीय रूग्णालयात भुलतज्ञाचा अभाव ; राजू मसुरकर यांच आवाहन

Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 21:01 PM
views 102  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञ डॉक्टरांची गरज असल्याने यासाठी 11 महिन्याचा करार केला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच सिव्हिल सर्जन ओरोस यांच्याकडे रितसर अर्ज केल्यास पंच्याऐंशी हजार पगार दर माहा मिळू शकतो. यासाठी रितसर अर्ज करावा असं आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी केलेय. उभा बाजार सावंतवाडी, 9422435760 या क्रमांकावर इच्छुक असणाऱ्या डॉक्टरांनी फोन करुन माहिती द्यावी व अर्जाची कॉपी या व्हाट्सअप नंबरवरती पाठवावी अस आवाहन केल आहे.


 याव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयामध्ये सायंकाळी च्यावेळी खाजगीरित्या भूलतज्ञ ची गरज असल्यास त्या ठिकाणी देखिल काम करता येते. शासकीय रुग्णालयामध्ये गरोदर माता यांचा सिजरिंगसाठी शस्त्रक्रियेच्या वेळी भुल देणे तसेच गर्भपिशवी काढणे,अपेन्डिस, हर्निया व छोटी मोठी हाडांचा शस्त्रक्रियांसाठी भुल देणे आवश्यक आहे. 


जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील तज्ञांनी यासाठी अर्ज कराव, याचा गोरगरिबांचा शस्त्रक्रियेसाठी लाभ घेण्यासाठी फायदा होईल असं मत राजू मसुरकर यांनी व्यक्त केले.