शालेय स्पर्धा परीक्षेत कुसूर खडकवाडी नं. १ शाळेचे घवघवीत यश

Edited by:
Published on: April 04, 2024 05:57 AM
views 183  views

वैभववाडी : विविध सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धा परीक्षेत कुसूर येथील खडकवाडी कुसूर नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. बीडीएस परीक्षेत या प्रशालेचे  सर्वज्ञ साळुंखे व विराज पाटील हे केंद्रात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सुवर्ण, कांस्य व रौप्य पदक प्राप्त केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


तालुक्यातील कुसूर नं१ शाळेतील  विद्यार्थी मंथन,बीडीएस व डॉ एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते.या परीक्षांचा नुकताच निकाल लागला.यामध्ये बीडएस परीक्षेत सर्वज्ञ विशाल साळुंखे याने १००पैकी ९७गुण मिळवित केंद्रात प्रथम येतं सुवर्ण पदक प्राप्त केले.तसेच मंथन परीक्षेत १५०पैकी १०८गुण मिळवून उत्तीर्ण झाला.याच शाळेचा विराज राजेंद्र पाटील  याने बीडिएसमध्ये ९६गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होत कांस्य पदक प्राप्त केले.तसेच मंथनन मध्ये १३२गुण मिळवून ए प्लस श्रेणी मिळवली आहे.गौरांग विनय साळुंखे याने बीडीएस परीक्षेत ९१गुण मिळवत रौप्य पदक प्राप्त केले.तसेच याने मंथनमध्ये १००गुण मिळवून बी प्लस श्रेणी मिळवली.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या डॉ एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेतही या शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.शाळेचा या परीक्षेचा निकाल १००टक्के लागला आहे.या परीक्षेत प्रशालेतील श्रीया दिपक पाटील ३००पैकी २३०,दुर्वा अविनाश पाटील २१८,अभिराज मनोज सुर्वे १४८ गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक विद्या पाटील यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती व गावचे ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.