कुणकेश्वर सरपंचपदी महेश ताम्हणकर

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 23, 2023 18:48 PM
views 74  views

देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे महेश विठ्ठल ताम्हणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी सरपंच सदस्य,चंद्रकांत विश्राम घाडी,प्रभारी सरपंच शशिकांत दाजी लब्दे, सदस्य संदीप आबा आचरेकर,सौ.अनिता अनिल पेडणेकर, सौ .अस्मिता सत्यवान नाणेरकर,सौ.सलोनी सच्चिदानंद आईर,सौ.सायली भरत वाळके,कु.मनाली रामदास तेली ग्रामसेवक गुणवंत पाटील उपस्थित होते. सरपंच निवडीबद्दल महेश ताम्हणकर यांचे सामाजिक कार्यकर्ते एकनाथ तेली विजय वाळके यासह सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे.