
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील जिल्हा परिषदच्या पूर्ण प्राथमिक केंद्रशाळेला दीक्षित फाऊंडेशन अंतर्गत सुसज्ज असे बालोद्यान उपलब्ध करून देण्यात आले. ९ डिसेंबर २०२४ रोजी बालोद्यान प्रदान सोहळा घेण्यात आला. बालोद्यानाचे उदघाटन दीक्षित फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.
कुणकेश्वर पंचक्रोशीत दीक्षित फाऊंडेशनने केलेल्या भरीव मदतीबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. दीक्षित फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांचा सर्व ग्रामस्थ व शिक्षकवृंद यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार कार्यक्रम करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुणकेश्वर गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच.महेश ताम्हणकर, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष. एकनाथ तेली, श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदसिद्ध विश्वस्त तथा गावकर श्रीकृष्ण अनंत उर्फ राजू बोंडाळे उपस्थित होते. त्याच बरोबर वि.का.सेवा सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर, कुणकेश्वरचे उपसरपंच शशिकांत लब्दे, शिक्षण प्रसारक मंडळ कुणकेश्वर चे चेअरमन चंद्रकांत घाडी, कुणकेश्वर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दीपक घाडी, चांदेल वाडीचे अध्यक्ष हेमंत वातकर, खालची वाडी अध्यक्ष दिलीप चव्हाण, कुणकेश्वर केंद्राच्या केंद्रप्रमुख भाग्यश्री जोईल, कुणकेश्वर हायस्कूल चे मुख्याध्यापक माधव यादव, वाडा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नारायण माने, माजी शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम तेली, प्रतिष्ठित ग्रामस्थ संजय आचरेकर इत्यादी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
तसेच कुणकेश्वर गावचे पालक, ग्रामस्थ तसेच माजी विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थितहोते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पदवीधर शिक्षिकाअमृता पाटील यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तात्या लवटे यांनी केले. आभार विठ्ठल थिकोळे सर यांनी व्यक्त केले.