
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील कु. कुणाल महेश चौकेकर याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित 16 वर्षांखालील लेदर बॉल क्रिकेट इन्व्हिटेशन लीगसाठी वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघात निवड झाली आहे. कुणाल शिरगाव क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून तो शिरगाव हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही निवड मिळवली आहे.
क्रिकेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून महेशच्या यशामुळे संपूर्ण शिरगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.या यशाबद्दल कुणाल महेश चौकेकरचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शाळा, अकॅडमी व पालकवर्गानेही समाधान व्यक्त केले असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी संस्था अध्यक्ष अरुण भाई कार्ले, संस्था पदाधिकारी शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, मानद अधीक्षक संदीप साटम, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.