चला कुडाळ घडवूया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 30, 2025 19:59 PM
views 20  views

कुडाळ : मराठा हॉल येथे दत्तप्रसाद शिरसाट यांनी आपला पूर्ण शैक्षणिक प्रवास ते आपली सर्व वाटचाल विद्यार्थ्यांना सांगून संवाद साधला सदर आयोजनातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून आयएएस परीक्षा व इतर साधनांबद्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमेश गाळवणकर, अरविंद शिरसाट,  बागवे सर, गुरबे सर, मराठा हॉलचे गवस कुडाळ संत राउल महाराज कॉलेजच्या स्मिता सर्वसे, ठाकूर, मनोज वालावलकर, नितीन नेमळेकर, जामसांडेकर, राजू केसरकर, सागर तेली  व अन्य मान्यवर उपस्थित होते

सदर संवादानंतर दत्ताप्रसाद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांची मुक्त चर्चा केली स्वतःच्या शैक्षणिक आयुष्यात व कॉलेज  आयुष्यात आपण यशस्वी होण्याकरता कशाप्रकारे मार्गक्रमण केले पाहिजे याचे देखील त्यांनी विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले  व विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्यामुळे विद्यार्थी वर्गाने त्यांचे आभार मानले 

सदर कार्यक्रमावेळी शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना मंदार शिरसाट यांच्या आयोजनाचे कौतुक केले व अशाच प्रकारचे कार्यक्रम हवेत अशा शुभेच्छा दिल्या. संत राऊळ महाराज कॉलेजच्या मुख्याध्यापिका सर्वसे यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम क्वचितच होतात व अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वतःच्या भविष्यासाठी फायदा करून घ्यावा असे मार्गदर्शन केले. 

उमेश गाळवणकर यांनी मार्गदर्शन करताना असे म्हटले की दुसरा कोणताही युवा कार्यकर्ता असता तर डिसेंबर एंडिंगला आज ऑर्केस्ट्रा ठेवला असता मात्र मंदार शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांची गरज समजून असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व घेत असलेल्या मेहनती बद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. मंदार शिरसाट यांच्या या उपक्रमामुळे मंदर शिरसाट यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे कौतुक होत.