लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 26, 2025 11:58 AM
views 30  views

कुडाळ : लघु व मध्यम उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी MSME च्या RAMP (रॅम्प) योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेली उद्योजकता मार्गदर्शन व आर्थिक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच RCT – RCT, कुडाळ तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेमध्ये लघु व मध्यम उद्योजक, नवउद्योजक तसेच स्वयंरोजगार इच्छुकांना व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शासकीय कर्ज व निधी उभारणीच्या योजना, आर्थिक व व्यवसाय नियोजन, व्यवसाय व्यवस्थापन, Innovate Scheme, बौद्धिक संपदा हक्क (IPR) तसेच Self-Assessment व Audit Process Optimization या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.

या कार्यशाळेसाठी  *इन्स्टिट्यूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स (IDEMI*) संस्थेच्या वतीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे माजी प्रादेशिक अधिकारी तसेच शिवमुद्रा इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. उमाप सर यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उद्योजकांना आर्थिक शिस्त, गुणवत्ता नियंत्रण तसेच उद्योग विस्ताराबाबत उपयुक्त माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री. उमाप सर यांचा सत्कार RCT कुडाळ शाखेचे प्रमुख श्री. रोडी सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री. रोडी सर यांचा सत्कार श्री. उमाप सर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी RCT संस्थेच्या कुडाळ येथील कर्मचारी शितल गणेशाचार्य यांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेदरम्यान उद्योजकांनी स्वमूल्यांकन, उत्पादन व सेवेची गुणवत्ता तपासणी, वेळ व आर्थिक नियोजन तसेच व्यवसायात शाश्वत वाढ कशी साधता येईल याबाबत प्रत्यक्ष उपयोगी माहिती मिळाल्याचे मत व्यक्त केले. या प्रशिक्षणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उद्योजकांच्या क्षमता वृद्धीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.