कुडाळ देवळी हितवर्धक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 20, 2025 17:49 PM
views 15  views

कुडाळ : कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची सभा संपन्न झाली असून, यामध्ये आगामी काळासाठी संघाची नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर यांची, तर कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये समाजातील आजी - माजी लोकप्रतिनिधी, वकील, डॉक्टर, पत्रकार आणि लेखापरीक्षक अशा सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश करण्यात आला असून, समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.

प्रमुख पदधिकारी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष : भास्कर केरवडेकर

कार्याध्यक्ष : निलेश तेंडुलकर

सचिव: अॅड. मिलिंद बांदिवडेकर

खजिनदार प्रदीप कुडाळकर

उपाध्यक्ष : प्रसाद साळगावकर, विनायक पिंगुळकर, नागेश ओरस्कर, संजय नाईक

सहसचिव : अरविंद तेंडोलकर, सुहास पाटकर

महिला संघटक : अर्चना घावनळकर

युवा संघटक : सागर वालावलकर

सल्लागार आणि मार्गदर्शक :

संघाच्या ध्येयधोरणांना दिशा देण्यासाठी ऍड. विवेक मांडकुलकर, ऍड. सुशांत पिंगुळकर, ऍड. अनघा तेंडुलकर, ऍड. विनय मांडकुलकर आणि सुहास बांबर्डेकर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा संघाचे अध्यक्ष राजन नाईक आणि ज्येष्ठ शिक्षक नेते सावळाराम अणावकर यांचे मार्गदर्शन या संघाला लाभणार आहे.

कायम निमंत्रित व मार्गदर्शक मंडळ :

सावळाराम अणावकर, घनश्याम वालावलकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश सावंत, दिनेश आजगावकर, मंदार परुळेकर, विकास कुडाळकर, प्रकाश नेरुरकर, दिगंबर गोवेरकर, बाळ कनयाळकर, महेश कुडाळकर, उदय कुडाळकर, वर्षा कुडाळकर आणि डॉ. अनिल साळगावकर यांचा मार्गदर्शक म्हणून समावेश आहे.

संघाची आगामी उद्दिष्टे :

नूतन कार्यकारिणीने समाजातील सर्व घटकांच्या अडीअडचणींना धावून जाण्याचा संकल्प केला आहे. प्रामुख्याने खालील विषयांवर भर दिला जाणार आहे:

 समाजातील गरजूंना अडीअडचणीच्या वेळी तात्काळ मदत करणे.

 देवस्थानिक कामांमध्ये कुठेही अन्याय होत असल्यास त्यावर विचारविनिमय करून न्याय मिळवून देणे.

 वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.

या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. कार्यकारिणीमध्ये शिवराम पणदूरकर, निलेश ओरस्कर, प्रशांत पोईपकर, डॉ. पी. डी. वराडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.