
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयातून २५/१५ अंतर्गत कुडाळ तालुक्यासाठी १ कोटी ५० लक्ष तर मालवण तालुक्यासाठी १ कोटी असा एकूण २ कोटी ५० लक्ष एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक विकासकामांना वाव मिळाला आहे.
गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची कामे निधी अभावी रखडली होती. वाडीअंतर्गत जाणारे रस्ते, पायवाटा, स्मशानभूमी शेड आदींची कामे या निधीमुळे पूर्णत्वास जाणार आहेत. आमदार राणे यांनी मंत्रालय स्थरावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याजवळ पाठपुरावा करत पहिल्या टप्यात अडीज कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर व मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे व विनायक बाईत यांनी आमदार राणे यांचे आभार मानले आहेत.










