
कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ (पाट) संचलित माड्याचीवाडी विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची जिल्हा कबड्डी संघामध्ये निवड झाली. सावंतवाडी येथे झालेल्या किशोरवयीन कबड्डी निवड चाचणीमध्ये माड्याचीवाडी विद्यालयातील मुलांच्या गटात रामचंद्र गुरुनाथ सरमळकर मुलींच्या गटात रुचिका दीपक पालकर व अंशिता संतोष जाधव यांची निवड झाली.
पुणे येथे होणाऱ्या पुढील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. विद्यालयाचे माजी क्रीडाशिक्षक राजन मयेकर, निवृत्त पोलीस सावंत व प्रशालेचे शिक्षक शामसुंदर राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक अनंत सामंत, राजेंद्र घाडीगावकर, एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.










