लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा 'दक्षता जनजागृती सप्ताह'

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 27, 2025 15:43 PM
views 40  views

कुडाळ :  भ्रष्टाचाराच्या समस्येवर मात करून पारदर्शक व नीतिमान महाराष्ट्र घडवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिनांक २७/१०/२०२५ ते दिनांक ०२/११/२०२५ या कालावधीत विभागातर्फे 'दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पूर्णपणे कटिबद्ध आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आणि लोकसेवकांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवात करणे, हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणताही लोकसेवक, सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर त्याबद्दल तात्काळ तक्रार दाखल करावी.

तक्रारीसाठी संपर्क साधा :

टोल फ्री क्रमांक: १०६४

संपर्क (कुडाळ कार्यालय): ०२३६२-२२२२८९

'लाच देणे आणि लाच घेणे' हा दोन्ही दंडनीय अपराध आहे. नागरिकांनी भ्रष्टाचाराला बळी न पडता, भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्गचे डी. वाय. एसपी  विजय पांचाळ यांनी केले आहे.