
कुडाळ : तेंडोली गावातील सहकारी दुध व्यवसाय संस्थेच्या चेअरमन पदी तेंडोलकर ॲग्रो कंपनीचे संस्थापक अरविंद तेंडोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी प्रकाश गावडे यांची निवड करण्यात आली. सर्वांनुमते ही निवड करण्यात आली. तेंडोली गावातील सहकारी दुध संस्थेची निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडली.
या निवडप्रसंगी तेंडोली माजी सरंपच मंगेश प्रभू, माजी तटांमुक्ती अध्यक्ष संदेश प्रभू, प्रकाश मांजरेकर तसेच संचालक मंडळातील गुरुनाथ पारकर, गुंडु पाटकर, राजन परब, सुरेश तेंडोलकर, प्रकाश पारकर, जयश्री पारकर,प्रकाश मुणनकर, सुरेखा तेंडोलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. चेअरमन अरविंद तेंडोलकर व प्रकाश गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.










