पणदूर ओव्हरब्रिजवर कारचा अपघात

५ प्रवासी जखमी | कारचं मोठे नुकसान
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 17, 2025 12:39 PM
views 715  views

कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या अपघातामुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, अपघातानंतर तातडीने स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत.