
कुडाळ : महिला उद्योजकांना दिवाळीनिमित्त हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटनेने यंदा 'कोकण महोत्सव' स्टॉल्सचे आयोजन केले आहे. दिनांक १६, १७ आणि १८ ऑक्टोबर असे तीन दिवस हे विशेष स्टॉल्स सिंधुदुर्ग चा राजा मैदान, कुडाळ येथे लावण्यात येणार आहेत.
या 'कोकण महोत्सव' स्टॉल्समुळे तालुक्यातील महिलांना त्यांच्या बचत गटातील तसेच वैयक्तिक उत्पादनांची (उदा. दिवाळी फराळ, गृहोपयोगी वस्तू, हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू) विक्री करण्याचे मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
तालुक्यातील सर्व महिलांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करावी, असे आवाहन नगरसेविका नेरुळकर यांनी केले आहे. अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी इच्छुक महिलांनी +९१ ९७६५२ ३११४३ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. महिलांना आर्थिक बळ देऊन त्यांना आत्मविश्वासाने उद्योगात पुढे आणण्यासाठी 'शिव उद्योग संघटनेचा' हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.