शिंदेसेनेच्या ओबीसी व्हि.जे.एन.टी. महिला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 06, 2025 15:31 PM
views 132  views

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या झाराप येथील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी शिवसेना ओबीसी व्हि. जे. एन. टी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 

यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, शिवाय महिला बाल कल्याण समिती, शिक्षण कमिटी,डोंगरी कमिटी , जिल्हा पुरवठा कमिटी या सारख्या जिल्हा कमिट्यांवर काम केलेलं आहे. गेली 3 वर्षे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पदाची धुरा यशस्वी रित्या सांभाळलेली आहे.  फार मोठा महिला वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे.