बांबूळीत भव्य रक्तदान शिबिर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 06, 2025 14:31 PM
views 161  views

कुडाळ : 'रक्तदान श्रेष्ठदान' या उदात्त हेतूने आणि "मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान" अंतर्गत बांबूळी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक ०५/१०/२०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रथमच तरुण ग्रामस्थांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन करताना गावचे सरपंच प्रशांत परब यांनी "रक्तदान श्रेष्ठदान - देऊ गरजूना जीवदान" असे आवाहन करत रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढवले.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अभिषेक फत्ततेवार यांच्यासह श्री. नितीन तुरणार, श्रीम. मयुर शिंदे, श्रीम. प्रांजली पावसकर, श्रीम. प्रांजली परब, श्री. सागर सावंत, श्री. विजय निरुखेकर, श्री. गावकर, पंचायत समिती कुडाळ माजी सभापती मान. अभयजी परब, गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री. प्रशांत परब, उपसरपंच श्री. सुभाष बांबुळकर, बच्चूजी मेस्त्री (ग्राम. सदस्य), बांबूळी आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री. गोसावी व श्री. निकम, तसेच गावचे पोलीस पाटील श्री. रंजीत परब, श्री. सिद्धेश भुजंग परब, श्री. मोहन परब, श्री. अण्णा परब, श्री. आनंद परब, आणि ग्रामपंचायत कर्मचारी श्री. गणेश परब आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष बांबुळकर यांनी केले. यावेळी नितीन तुरणार यांनी 'रक्तदान श्रेष्ठदान' याचे महत्व रक्तदात्यांना प्रभावीपणे पटवून सांगितले. त्यानंतर सरपंच आणि मुख्य अतिथी अभयजी परब यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरात प्रशांत परब, विशाल परब, सिद्धेश बांबुळकर, सुशांत बांबुळकर, रंजीत परब, प्रसाद परब, चिंतामणी परब, अवधूत परब, सिताराम परब, दिव्या परब, स्नेहा बांबुळकर, अक्षय बांबुळकर, महेंद्र बांबुळकर, दीपेश परब, निखिल परब, रोहन परब, वैभव परब, रोषन परब,  भूषण घोगळे, सुभाष बांबुळकर  एकूण १६ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये ०२ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश होता.

रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर, सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या (सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य) हस्ते प्रमाणपत्र आणि कार्ड वितरित करण्यात आले. अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बांबूळीच्या तरुण ग्रामस्थांनी एकत्र येऊन आयोजित केलेले हे प्रथमच शिबिर गरजू रुग्णांना जीवदान देण्याच्या दृष्टीने एक प्रेरणादायी आणि यशस्वी उपक्रम ठरला.