सांगिर्डेत नवरात्रोत्सवातल्या खेळ पैठणीच्या मानकरी सीमा शिंदे

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 29, 2025 12:36 PM
views 425  views

कुडाळ :  नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीच्या स्पर्धेत या पैठणीच्या मानकरी सीमा शिंदे ठरल्या. निवेदक गायक समीर चराटकर यांचा सुरेल आवाज, त्याचबरोबर भाई तेरसे यांची वादनावरची किमया थक्क करणारी ठरली, अनेकांचे सत्कार यामुळे या नवरात्र सोहळ्याला चार-चांद लागले. 

वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी तर्फे कुडाळ शहरातील सांगिर्डे येथे सुरू असणाऱ्या नवरात्र उत्सवात गरबा रासबरोबरच गेले आठ दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे भरगच्च  आयोजन ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी, सांगिर्डे ,बजाज शो रूमच्या पाठीमागे  करण्यात आले आहे . दररोज सूर ताल लयच्या विश्वात संगीतावर ठेका धरून नृत्य सादर  गरबा रास नृत्याविष्कारामुळे नवरात्र उत्सवात रंगत आली आहे. मुलांचे रेकॉर्ड डान्स,फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुद्धा झाल्या शनिवारी रात्री होम मिनिस्टर अर्थात महिलांच्या कलागुणांना वाव देणारा खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात २५ महिलांनी सहभाग घेतला होता. निवेदक समीर चऱ्हाटकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने केली तर श्रीदेवी शारदेच्या गायनाने भाई तेरसे यांनी आपल्या सुरेल गायनाने या सोहळ्यात रंगत आणली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ज्येष्ठ श्रीमती प्रभू, मधुसूदन वालावलकर मनिषा वालावलकर, रामचंद्र आदुर्लेकर वैद्य, महेश प्रभू , ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीचे अध्यक्ष संतोष वालावलकर, संदीप धामापूरकर ,अनंत जामसंडेकर, विवेक पंडित, प्रतिक्षा सावंत कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत ,समीर वालावलकर ,रूपेश पाटकर, वस्त्र वेधाच्या संचालिका योगिता वालावलकर ,सीमा शिंदे, सुप्रिया धामापूरकर तेजल वालावलकर सौ परब, संदीप प्रभू ,श्री तटकरे ,श्रीमती आंबेरकर, संदीप शिंदे पूजा नाईक ,पूजा घेवडे, अन्वी जाधव, श्री यादव रेसिडेन्सीचे सदस्य आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना पंडित म्हणाले आपला नवरात्र सोहळा हा सर्वांना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम ड्रीमस्क्वेअर रेसिडेन्सी च्या सर्व सभासदांनी आणला अशा कार्यक्रमातून सामाजिक भावना वाढीस लागतात आज  नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गेले तीन वर्षे हा कार्यक्रम घेऊन येतील मुले महिला यांच्या कलागुणांना वाव देण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन संतोष वालावलकर यांनी केले.