कुडाळ इथं तब्बल २ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 28, 2025 10:55 AM
views 1867  views

कुडाळ :  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.  स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला कुडाळ येथील एका पान टपरीवर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इमरान  शमसुद्दीन करोल, इम्तियाज शमसुद्दीन करोल (दोघेही राहणार करोलवाडी, कुडाळ), आरिफ करोल (रा. शिवाजीनगर, कुडाळ), समीर पठाण (रा. हुबळी, कर्नाटक) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३,३ (५), अन्न सुरक्षा मानके कलम ५९ अनुसार कारवाई करण्यात आली आहे. 

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम त्यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा,आशिष जामदार यांनी केली.