पालकमंत्री नितेश राणेंनी कुडाळकर कुटुंबीयांचं केले सांत्वन

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 27, 2025 20:47 PM
views 144  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे गटनेते व नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या भगिनी हेमलता धोंडू कुडाळकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळ येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुडाळकर कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. कुडाळकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत, पालकमंत्री नितेश राणे यांनी विलास कुडाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला.

या सांत्वन भेटीच्या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रणजित देसाई, राजू राऊळ, बंड्या सावंत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी देखील कुडाळकर कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करत त्यांचे सांत्वन केले.