अपघातातील गंभीर जखमींना धीरज परब यांची मदत

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 27, 2025 20:42 PM
views 107  views

​कुडाळ : कुडाळ येथील पंडित हॉस्पिटलसमोर  झालेल्या एका अपघातात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना, सरकारी रुग्णालयाच्या समोर अपघातग्रस्त वाहनांमुळे जिजामाता चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत रस्त्यावर मोठे ट्रॅफिक जाम झाले होते. ​या वाहतूक कोंडीमुळे अ‍ॅम्ब्युलन्सला पुढे मार्ग मिळत नव्हता. याच दरम्यान, अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी तेथे आलेल्या मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी तातडीने रस्त्यावर उतरून सूत्रे हाती घेतली. त्यांनी स्वतः वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ट्रॅफिकमधून अ‍ॅम्ब्युलन्सला तात्काळ वाट मोकळी करून दिली.

​या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून, अपघात कसा घडला हे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ​धीरज परब हे नेहमीच सामाजिक प्रश्नांवर अत्यंत संवेदनशील भूमिका घेतात. काल त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे, उपस्थितांकडून "गरज तिथे धीरज" हे वाक्य परब यांना साजेल, असे कौतुक केले गेले. गंभीर जखमींना तातडीने उपचारासाठी मदत मिळवून देण्यासाठी परब यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली आहे.