नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले

दोघे गंभीर जखमी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 26, 2025 16:49 PM
views 1847  views

कुडाळ : नगरपंचायतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतीचे बॅनर काढण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपंचायतीकडून लावण्यात आलेले बॅनर काढण्याचे काम सुरू होते. बॅनर ट्रॅक्टरमध्ये टाकून आणले जात असताना, अचानक ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या या ट्रॅक्टरखाली दोन दुचाकीस्वार चिरडले गेले. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. दोन्ही जखमींना अधिक उपचारांसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.