
कुडाळ : कवठी येथील भजन कला प्रेमी मंच यांच्या वतीने श्री सातेरी मंदिर कवठी येथे नवरात्रोत्सवा निमित्त तिसरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा दिनांक २६ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पारितोषक ७००१/- व चषक,द्वितीय ५००१/- व चषक, तृतीय ३००१/- व चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच उत्तेजनार्थ दोन संघाची निवड करून प्रत्येकी २००१/- व प्रमाण पत्र देण्यात येणार आहेत.तसेच उत्कृष्ठ वादक, झांज वादक व उत्कृष्ठ कोरस या सोबत इतर वैयक्तीक बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जाहीर कोला जाणार आहे. तरी या स्पर्धेसाठी इच्छुक मंडळानी आपल्या संधाचे नाव दिनांक २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत श्री दत्तप्रसाद खडवपकर मो. नं. 9420241160 यांन कडे नोंदवायचे आहे असे आवाहन भजन काल प्रेमी मंच कवठी यांच्यावतीने कारण्यात आले आहे.










