गोपीचंद पडळकरांविरोधात जिल्ह्यात राष्ट्रवादी आक्रमक

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 20, 2025 13:44 PM
views 225  views

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरचे विधान केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर निषेध केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार कुडाळ येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रसाद रेगे, शिवाजीराव घोगळे, साबा पाटकर, उत्तम सराफदार, अनंत पिळणकर, सचिन पाटकर, नजीर शेख, अशोक कांदे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सुधा सावंत, पुंडलिक दळवी, बावतीस फर्नांडिस, देवेंद्र टेमकर, नंदू साटेलकर, नईम मेमन, अंजला नाईक, रजब खान, दानिश तेहसीलदार, देवेंद्र पिळणकर, उत्तम तेली, महेश चव्हाण, बाळा मसुरकर, संतोष चव्हाण, राजू वाघाटे, रोहित वाघाटे, रमेश रावराणे, प्रीतम रावराणे, तुषार पिळणकर आणि सुजल शेलार यांचा समावेश होता.

यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आणि भविष्यात अशा प्रकारची विधानं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला.