
कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील प्रत्येक कुटुंबाशी नाळ जुळलेले कुटुंब म्हणजे अतुल बंगे दांपत्य यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षि गावातील प्रत्येक कुटुंबातील गणपती दर्शन घेऊन सेवा बजावली. अतुल बंगे दांपत्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला आपलेसे वाटणारे व्यक्तीमत्व अनेक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत गावातील महीला व जेष्ठ ग्रामस्थांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात. दरवर्षी गावातील प्रत्येक कुटुंबातील गणपती दर्शन घेऊन पुजा साहीत्य देऊन श्री गणरायांचे आशिर्वाद घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाची विचार पुस करुन अडीअडचणी विचारुन घेत असतात. या गणोत्सव काळात प्रत्येक कुटुंबाशी हीतगुज करुन आपले जिव्हाळ्याचे संबंध बंगे कुटुंब सांभाळत आहेत.
दरवर्षी गणोत्सव काळात पहील्या दीवसा पासुन पाच दीवस, सात दीवस, नऊ दीवस, अकरा दिवस या दीवसात प्रत्येक कुटुंबात जाण्याचा प्रयत्न करत असतात.










