
कुडाळ : कुडाळ येथील केळबाई मंदिर परिसरात राहणारे ५० वर्षीय संतोष परशुराम वारंग हे २० जुलैपासून बेपत्ता झाले असून, त्यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मूळचे मुंबईचे असलेले संतोष वारंग सध्या केळबाई मंदिरानजीक भाड्याच्या घरात राहत होते. २० जुलै रोजी ते मुंबईला जातो असे सांगून घरातून निघाले होते, मात्र अद्याप ते परत आलेले नाहीत, अशी माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.
संतोष वारंग यांचे वर्णन सावळे, सडपातळ असे असून, त्यांची उंची अंदाजे ५ फूट ३ इंच आहे. घरातून निघताना त्यांनी चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. कुडाळ पोलीस अधिक तपास करत असून, भोई हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. संतोष वारंग यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.