डॉ. परब हॉस्पिटलमध्ये जनरेटरला आग

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 21, 2025 19:39 PM
views 3406  views

कुडाळ : जिजामाता चौक येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत  जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली. परंतु अग्नशामक दल तत्काळ त्याठिकाणी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

कुडाळ  जिजामाता चौक  येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे जनरेटरला आग लागली. परंतु प्रसंगावधान राखत त्वरीत कुडाळच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी कुडाळचे अग्निशामक दलाने तात्काळ त्याठिकाणी दाखल होत कार्यवाही करत आग विझवली.  त्यामुळे एक बाका प्रसंग टाळला.