रोटरीच्या माध्यमातून गरजू लोकांना उभारीच कार्य : संग्राम पाटील

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण समारंभ उत्साहात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 18, 2025 15:28 PM
views 32  views

कुडाळ : रोटरी इंटरनॅशनल हि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था असून रोटरीच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व गरजू लोकांना उभारी देणारे सर्वोत्तम कार्य या संस्थेच्या माध्यमातून लाखो रोटरी सदस्यांनी केले आहे.विविध क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जोपासणारी व्यक्ति या संस्थेच्या माध्यमातून योगदान देत असतात.रोटरी क्लब ऑफ कुडाळ गेली 31 वर्षे कुडाळ मध्ये दर्जेदार प्रोजेक्ट यशस्वी करत आहेत याचा सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वार्षिक पदग्रहण सोहळ्यानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे माजी प्रांतपाल तथा प्रसिद्ध उद्योगपती संग्राम पाटील यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा वार्षिक पदग्रहण समारंभ महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी रोटरी सिंधुरत्न बुलेटीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पदग्रहण अधीकारी संग्राम पाटील (कोल्हापूर),उपप्रांतपाल डाॅ विनया बाड, कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे,गव्हर्नर एरिया एड डाॅ.विद्याधर तायशेटये, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, उपप्रांतपाल डाॅ प्रशांत कोलते व सचिन मदने ,नगरसेवीका चांदनी कांबळी,रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे मावळते अध्यक्ष डाॅ संजय केसरे ,नूतन अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ च्या अध्यक्षा सौ सानिका मदने ,सचिव सौ सई तेली,खजिनदार सौ गितांजली कांदळगावकर, पीडीसी डाॅ सायली प्रभू, आय एस ओ सौ मेघा भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.

भविष्यात विविध उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल : तहसिलदार विरसिंग वसावे

वार्षिक पदग्रहण सोहळ्यात प्रमुख उपस्थितीत असलेले कुडाळ चे तहसिलदार विरसिंग वसावे यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे कार्य आदर्शवत असून आपण या संस्थेचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे.भविष्यात विविध उपक्रमात सहभागी व्हायला मला आवडेल असे प्रतिपादन केले.

वर्षभरात विविध प्रोजेक्ट यशस्वी करूयात : उपप्रांतपाल डाॅ. विनया बाड 

रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल अरूण भंडारे यांचे मार्गदर्शनाखाली वर्षभरात मुलींसाठी सायकल वाटप, शिलाई मशिन्स वाटप, डेस्कबेंच वितरण,सौर उर्जा किट वितरण असे विविध प्रोजेक्ट यशस्वी करूयात असे आवाहन उपप्रांतपाल डाॅ विनया बाड यांनी केले. 

रोटरी व्होकेशनल अवाॅर्ड वितरण

यावर्षीचा रोटरी व्होकेशनल अवाॅर्ड सरंबळचे प्रगतशील सेंद्रीय भाजीपाला शेतकरी सुरेश भाऊराव परब यांना पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल संग्राम पाटील यांचे हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार वितरण

दरवर्षी दिला जाणारा कै राजश्री एकनाथ पिंगुळकर स्मृतिप्रीत्यर्थ रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार जि.प.प्रा. शाळा कुडाळ पडतेवाडीच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ सुरेखा कदम कोकितकर यांना देवून गौरविण्यात आले.

रोटरी सदस्यांचा सन्मान

रविंद्र परब यांच्या अरूणा क्लिनिकल लॅब ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आय एस ओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.डाॅ जी टी राणे यांना मुंबई रोड रनर्स कडून बेस्ट हाफ मॅरेथॉन आयोजनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.डाॅ राजवर्धन देसाई यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली दंत प्रत्यारोपन क्लिनिक सुरू केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.डाॅ शिल्पा पवार यांना होमिओपॅथिक पी जी मध्ये विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

प्रणय तेली यांची रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी इंटरनॅशनल कन्व्हेनशन पदी निवड झालेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.तर सचिन मदने यांची असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झालेबद्दल विशेष सन्मान करण्यात आला .

रोटरी क्लब चा अध्यक्ष होणे हे माझं भाग्य : डाॅ. संजय केसरे

वार्षिक पदग्रहण सोहळ्यात मावळते अध्यक्ष डाॅ. संजय केसरे यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चा 31 वा अध्यक्ष होणं हे माझं भाग्य आहे.माझ्या अध्यक्षीय कार्यकाळात रोटरी डायलेसीस सेंटर, डोकोजू धन्यवाद उपक्रमांतर्गत 10 हजार फळझाडे लागवड करणे, जिल्हास्तरीय शरिर सौष्ठव स्पर्धा आयोजन,बांधकाम कामगार आरोग्य शिबीर, एस टी कर्मचारी आरोग्य शिबीर, 40 लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया शिबीर, महिला रूग्णालयात गरोदर मातांना प्रोटीन पावडर वाटप, कुडाळ एस टी बसस्थानकावर पिण्याच पाण्याचा आरो प्लांट बसवणे,वैद्य सुविनय दामले यांची आयुर्वेदावर  व्याख्यानमाला, असे विविध समाजपयोगी प्रोजेक्ट यशस्वी करता आले याचे श्रेय रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या सर्व सदस्यांना जाते असे प्रतिपादन मावळते अध्यक्ष डाॅ. संजय केसरे यांनी व्यक्त केले.

नवीन सदस्यांना पदग्रहण

कुडाळचे प्रसिद्ध सर्जन डाॅ अनिकेत वजराटकर यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सदस्यत्व देण्यात आले.तर सुधेंद्र डोकोजू यानाही रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे सदस्यत्व देण्यात आले.

रोटरी सदस्यांच्या गुणवंत पाल्य सन्मान

मधुरा नाईक (राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन सहभाग),भार्वी नाईक (कब बूलबुल विशेष प्राविण्य),डाॅ सुमेध सावंत व डाॅ समृध्दी सावंत( MDS प्रवेश),वेदांत मदने 10 (92.40%),ओम नाईक 10 वी (88%),अनुश्री परूळेकर 10 (97%),ऋतुश्री केसरे 10 वी (90%),गौरिश तेली 12 वी विज्ञान( 88%),नुपूर परब 12 वी विज्ञान (71%),क्रांती पवार-स्पर्धा परिक्षा प्राविण्य, निल कांदळगावकर-(8 वी शिष्यवृत्ती),अन्वी कांदळगावकर (एटी एस सुवर्ण पदक)आदी गुणवंत पाल्यांचा सन्मान संग्राम पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

सूत्रसंचालन डाॅ. राजवर्धन देसाई, डाॅ. जयश्री केसरे यांनी केले तर आभार सचिव मकरंद नाईक यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे वार्षिक पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी माजी प्रांतपाल संग्राम पाटील, नूतन पदाधिकारी-सदस्य अध्यक्ष राजीव पवार, सचिव मकरंद नाईक, खजिनदार राकेश म्हाडदळकर, उपप्रांतपाल सचिन मदने, मावळते अध्यक्ष डाॅ. संजय केसर आदी मान्यवर उपस्थित होते.