'सिंधुदुर्गचा राजा'च्या मंडपाचे काम सुरू

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: July 18, 2025 13:21 PM
views 121  views

कुडाळ :  गणेश चतुर्थीला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. सिंधुदुर्गचा राजा दरवर्षी कुडाळ येथे विराजमान होतो. यंदाही सिंधुदुर्गच्या राजाचे स्वागत करण्यासाठी भव्य दिव्य मंडप उभारला जात आहे. मंडपाचे काम लवकर सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्गच्या राजाची मंडपाची भव्यदिव्यता ही डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. घरगुती गणपतींबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मोठ्या उत्साहात गणपतीची स्थापना करतात.

कुडाळ येथील 'सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान' च्या वतीने स्थानापन्न होणारा गणपती विशेषतः प्रसिद्ध आहे. हा गणपती आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे साजरा केला जातो. या उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक योजनांचा समावेश असतो. कुडाळ येथील 'सिंधुदुर्गचा राजा' हा एक महत्त्वाचा सार्वजनिक गणेशोत्सव आहे, जो जिल्ह्यातील उत्सवप्रियतेचे प्रतीक बनला आहे.